22.02.2024 : राज्यपाल व केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी राजभवन येथे केंद्रीय व राज्य शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली
22.02.2024 : राज्यपाल रमेश बैस व केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी आज राजभवन मुंबई येथे केंद्रीय व राज्य शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन राज्यात सुरु असलेल्या आदिवासी विकासाच्या केंद्रीय अर्थसहाय्यित योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. बैठकीला केंद्रीय जनजाती मंत्रालयातील अतिरिक्त सचिव डॉ नवलजीत कपूर, राज्याच्या आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त राजेंद्र भारुड, राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळाचे (ट्रायफेड) व्यवस्थापकीय संचालक टी. रौमून पैते, शबरी आदिवासी वित्त विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड व इतर अधिकारी उपस्थित होते.
22.02.2024: Maharashtra Governor Ramesh Bais accompanied by Union Minister of State for Tribal Affairs Dr Bharati Pawar reviewed the implementation of various Centrally Assisted Tribal Welfare Schemes in Maharashtra at Raj Bhavan Mumbai. The meeting was attended by Additional Secretary, Ministry of Tribal Affairs Dr Navaljit Kapoor, Secretary, Tribal Welfare Vijay Waghmare, Commissioner of Tribal Welfare Nayana Gunde, Commissioner, Tribal Research and Training Institute Rajendra Bharud, TRIFED M D T. Roumuan Paite, MD of Shabari Adivasi Vitta Vikas Mandal Leena Bansod and other officials.