21.12.2021 : राज्यपालांच्या हस्ते विविध क्षेत्रातील समाज सेवकांना शहीद-ए-आझम प्रेरणा पुरस्कार प्रदान
21.12.2021 : देशासाठी कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या हुतात्म्यांच्या कुटुंबियांना तसेच कारगिल युद्धात अपंगत्व आलेल्या वीर सैनिकांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले. जन्नत फिल्म्स संस्थेचे प्रमुख रईस खान यांच्या पुढाकाराने राजभवन येथे आयोजित या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुणवंत व्यक्तींना शहीद-ए-आझम प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आले. इंग्लंड येथील समाज सेविका डॉ परिन सोमाणी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होत्या.
21.12.2021 : Governor Bhagat Singh Koshyari felicitated family members of martyrs of Kargil War and War Injured Jawans at a programme held at Raj Bhavan, Mumbai. The Governor also presented the ‘Shahid–E–Azam’ Motivational award to 40 well known personalities on the occasion.