21.11.2023: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी महाशिबिराचे आयोजन
21.11.2023: 'विकसित भारत संकल्प यात्रा' अभियानांतर्गत मोडाळे, ता. इगतपुरी, जिल्हा नाशिक येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते संकल्प यात्रेला झेंडी दाखवून रवाना करण्यात आले तसेच विविध विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लक्षित लाभार्थ्यांना लाभ वितरण प्रमाणपत्र देण्यात आले. राज्यपालांनी शिरसाटे गावात कृषी विभागामार्फत ड्रोनच्या माध्यमातून नॅनो युरिया फवारणीचे प्रात्यक्षिक देखील पहिली. यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, शासनाचे वरिष्ठ अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
21.11.2023: Maharashtra Governor Ramesh Bais attended the 'Viksit Bharat Sankalp Yatra' campaign and distributed the benefits of various Government schemes to selected beneficiaries at Modale, Tq. Igatpuri, Dist. Nashik. The Governor also witnessed the demonstration of Nano Drone spraying of urea at village Shirsate in Igatpuri. The Governor flagged off the Viksit Bharat Sanklap Yatra that has been organised to extend the benefit of various government schemes to the unreached beneficiaries. Guardian Minister of Nashik Dadaji Bhuse, Deputy Speaker of Maharashtra Legislative Assembly Narahari Zirwal, MLA Hiraman Khoskar, Divisional Commissioner Radhakrishna Game, senior government officials and citizens were present on this occasion.