23.09.2023 : राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज राजभवन येथील त्यांच्या निवासस्थानी 5 दिवसांसाठी बसवण्यात आलेल्या गणरायाचे विधिवत विसर्जन करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते श्रीगणेशाची पूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राजभवनाच्या समुद्रकिनाऱ्यावर गणरायाचे विसर्जन केले.