21.05.2023 : राज्यपाल, मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत समुद्र स्वच्छता मोहिम संपन्न
21.05.2023 : भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या जी 20 देशाच्या परिषदेचा एक भाग म्हणून मुंबई येथील जुहू चौपाटी येथे जी - २० देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत सागरी किनारा स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरण बदल मंत्रालयाच्या पुढाकाराने आयोजित या सागरी किनारा स्वच्छता मोहिमेला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पर्यावरण व वन मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे, महाराष्ट्राचे पर्यटन, कौशल्य तसेच महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा तसेच जी-20 देशांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. यावेळी राज्यपालांनी उपस्थितांना समुद्राचे किनारा स्वच्छ ठेवण्याची तसेच प्रदूषण व कचऱ्यापासून समुद्राचे रक्षण करण्याची शपथ दिली.