21.04.2025: राज्यपालांनी ज्येष्ठ पत्रकार राहुल पांडे यांना यांना राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली
21.04.2025: महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज ज्येष्ठ पत्रकार राहुल पांडे यांना राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राजभवन मुंबई येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभात राज्यपालांनी रवींद्र ठाकरे, प्रकाश इंदलकर व गजानन निमदेव यांना देखील राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली. सुरुवातीला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे तसेच इतर माहिती आयुक्त यांच्या नियुक्तीची अधिसूचना वाचून दाखविली. शपथविधी सोहळ्याला विधान परिषद सदस्य परिणय फुके, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालक ब्रिजेश सिंह, पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मान्यवर उपस्थित होते.
21.04.2025: Maharashtra Governor C. P. Radhakrishnan today administered the Oath of office to the newly appointed State Chief Information Commissioner Rahul Pande at a brief swearing in ceremony held at Raj Bhavan, Mumbai. In the oath taking ceremony attended by State Chief Minister Devendra Fadnavis, the Governor also administered the Oath of office to three State Information Commissioners - Ravindra Thakre, Prakash Indalkar and Gajanan Nimdev. Earlier, Secretary to the Governor Dr. Prashant Narnaware read out the notification of appointment of the State Chief Information Commissioner and State Information Commissioners. The oath-taking ceremony was attended by MLC Parinay Phuke, Chief Secretary Sujata Saunik, Principal Secretary to the Chief Minister Brijesh Singh, senior journalists and dignitaries from various walks of life.