20.08.2021: उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ९ महिलांना राज्यपालांच्या हस्ते स्त्री शक्ती सन्मान प्रदान
20.08.2021: समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ९ महिलांना राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात ‘स्त्री शक्ती सन्मान’ प्रदान करण्यात आले. ‘अभियान’ या सामाजिक सांस्कृतिक संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी सदस्या नफिसा हुसैन, समाजसेविका व माजी सरपंच देवकी डोईफोडे, धावपटू मैथिली अगस्ती, दिव्यांग जलतरणपटू जिया राय, महिला उद्योजिका स्वाती सिंह, साप्ताहिक विवेकच्या संपादिका अश्विनी मयेकर, अभिनेत्री राजेश्वरी सचदेव, हिंदी साहित्यिक डॉ भारती गोरे व पार्श्वगायिका रीवा राठौड यांना स्त्री शक्ती सन्मान देण्यात आला. कार्यक्रमाला आमदार आशिष शेलार, उद्योजक विनीत मित्तल व ‘अभियान’चे अध्यक्ष अमरजीत मिश्र उपस्थित होते.
20.08.2021: Governor Bhagat Singh Koshyari presented the ‘Stree Shakti Samman’ to nine women achievers from various walks of life at Raj Bhavan, Mumbai. Former Member of National Commision for Women Nafeesa Hussain, Divyang swimmer Jiya Rai, entrepreneur Swati Singh, Athelete Maithali Agasti, playback singer Reewa Rathod, film star Rajeshwari Sachdeva, Hindi writer Dr Bharti Gore, former Sarpanch Devki Doiphode and editor of weekly ‘Vivek’ Ashwini Mayekar were felicitated by the Governor on the occasion. The felicitation was organised by ‘Abhiyan’ a social and cultural organization. MLA Ashish Shelar, industrialist Vinit Mittal and Founder of ‘Abhiyan’ Amarjeet Mishra were present.