19.06.2023 : राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत बाटुचा पंचविसावा दीक्षांत समारंभ संपन्न
19.06.2023 : डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा पंचविसावा दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न झाला. दीक्षांत समारोहाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उदयोग मंत्री तसेच रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. कारभारी काळे यांसह विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांचे सदस्य, अधिष्ठाता, प्राध्यापक व स्नातक उपस्थित होते. दीक्षांत समारोहात २२२६७ स्नातकांना अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, वास्तुशास्त्र, फार्मसी, हॉटेल व्यवस्थापन आदी विषयांमधील पदवी, पदव्युत्तर पदव्या व पदविका प्रदान करण्यात आल्या. यामध्ये १३ उमेदवारांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली.