19.05.2023 : राज्यपालांच्या हस्ते ‘जीवनाची सुलभता : नागरिकांचा मूलभूत अधिकार’ परिषदेचे उदघाटन संपन
19.05.2023 : राज्यपालांच्या हस्ते 'जीवनाची सुलभता : नागरिकांचा मूलभूत अधिकार' परिषदेचे उदघाटन संपन्न
19.05.2023 : इंडियन मर्चंट चेंबरतर्फे आयोजित तिसऱ्या 'इज ऑफ लिविंग: नागरिकांचा मूलभूत अधिकार' या विषयावरील परिषदेचे उदघाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई येथे झाले. उदघाटन सत्राला इंडियन मर्चंट चेंबरचे अध्यक्ष अनंत सिंघानिया, पदनिर्देशित अध्यक्ष डॉ समीर सोमैया, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर व 'आयएमसी - इज ऑफ लिविंग समिती'चे अध्यक्ष एम के चौहान, वरिष्ठ शासकीय व नागरी सेवा अधिकारी तसेच उद्योजक प्रामुख्याने उपस्थित होते.