19.03.2026 : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते लोकभवनात इतिहास व अभिलेख दालनाचे उदघाटन
Zoom 19.03.2026 : महाराष्ट्र लोकभवन येथे गेल्या १५० वर्षात घडलेल्या निवडक ऐतिहासिक घटना, राष्ट्रीय अतिथींच्या गाठीभेटी तसेच महत्वाच्या दस्तावेजांचे छायाचित्ररूपी संकलन असलेल्या 'राज्यपाल दालनाचे' उदघाटन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते लोकभवन मुंबई येथे करण्यात आले. राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे व जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी राज्यपालांना दालनात लावण्यात आलेल्या छायाचित्रे व दस्तावेजांची माहिती दिली. लोकभवनच्या संकेत स्थळावर नोंदणी करुन लोकभवन पाहण्यास येणाऱ्या अभ्यागतांना हे दालन पाहता येणार आहे.
19.03.2026 : महाराष्ट्र लोकभवन येथे गेल्या १५० वर्षात घडलेल्या निवडक ऐतिहासिक घटना, राष्ट्रीय अतिथींच्या गाठीभेटी तसेच महत्वाच्या दस्तावेजांचे छायाचित्ररूपी संकलन असलेल्या 'राज्यपाल दालनाचे' उदघाटन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते लोकभवन मुंबई येथे करण्यात आले. राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे व जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी राज्यपालांना दालनात लावण्यात आलेल्या छायाचित्रे व दस्तावेजांची माहिती दिली. लोकभवनच्या संकेत स्थळावर नोंदणी करुन लोकभवन पाहण्यास येणाऱ्या अभ्यागतांना हे दालन पाहता येणार आहे.