19.02.2026 : शिव जयंती निमित्त राज्यपालांचे दादर येथील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
Zoom 19.02.2026 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त, बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे आयोजित 'शिवजयंती उत्सव' कार्यक्रम प्रसंगी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर पालिकेने क्रीडा भवन येथे आयोजित कार्यक्रमात संगीत कला अकादमीच्या कलाकार संगीत शिक्षकांनी पोवाडे व देशभक्तीपर गीते सादर केली. मुंबईच्या महापौर रितु तावडे, खासदार अनिल देसाई, आमदार सुनील शिंदे, महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.
19.02.2026 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त, बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे आयोजित 'शिवजयंती उत्सव' कार्यक्रम प्रसंगी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर पालिकेने क्रीडा भवन येथे आयोजित कार्यक्रमात संगीत कला अकादमीच्या कलाकार संगीत शिक्षकांनी पोवाडे व देशभक्तीपर गीते सादर केली. मुंबईच्या महापौर रितु तावडे, खासदार अनिल देसाई, आमदार सुनील शिंदे, महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.