19.02.2025: ब्राझीलमधील गोयास राज्याचे गव्हर्नर रोनाल्डो रामोस कैआडो यांनी घेतली राज्यपालांची भेट
19.02.2025: ब्राझीलमधील गोयास राज्याचे गव्हर्नर रोनाल्डो रामोस कैआडो यांनी आज राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.या बैठकीत महाराष्ट्र आणि गोयास राज्यांमधील कृषी, ऊर्जा संक्रमण आणि व्यापार क्षेत्रात संबंध वाढविण्याबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीला ब्राझीलचे मुंबईतील वाणिज्यदूत जाओ डी मेंडोन्सा लिमा नेटो, गोयास राज्याचे उद्योग आणि वाणिज्य सचिव जोएल दा संत'अँना ब्रागा फिल्हो, गोयास राज्याचे कृषी, पशुधन आणि पुरवठा सचिव पेड्रो लिओनार्डो डी पॉला रेझेंडे, गोयास राज्याचे आरोग्य सचिव रासिव्हेल डोस रीस सांतोस ज्युनियर, इंडो-ब्राझिलियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे संस्थापक सरचिटणीस पाउलो अझेवेडो आणि इंडो ब्राझिलियन चेंबरचे नव - व्यवसाय संचालक नरेंद्र पाटील उपस्थित होते
19.02.2025: The Governor of the State of Goiás, Brazil H.E. Ronaldo Ramos Caiado met the Governor of Maharashtra C P Radhakrishnan at Raj Bhavan Mumbai. Matters of enhancing relations between Maharashtra and the State of Goias in the areas of Agriculture, Energy transition and trade were discussed at the meeting. Consul General of Brazil in Mumbai João de Mendonça Lima Neto, Secretary of Industry and Commerce, State of Goiás, Brazil Joel da Sant’Anna Braga Filho, Secretary of Agriculture, Livestock, and Supply, State of Goiás, Brazil Pedro Leonardo de Paula Rezende, Secretary of Health, State of Goiás, Brazil Rasível dos Reis Santos Júnior, Founder, General Secretary of Indo-Brazilian Chamber of Commerce & Industry (IBCCI) Paulo Azevedo and New Business Director of Indo Brazilian Chamber Narendra Patil, were present.