19.01.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदींच्या ‘एक्झाम वॉरियर्स’ आवृत्तीचे प्रकाशन संपन
19.01.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदींच्या 'एक्झाम वॉरियर्स' आवृत्तीचे प्रकाशन संपन्न
19.01.2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या 'एक्झाम वॉरियर्स' या पुस्तकाच्या नवीन व विस्तारित मराठी आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे झाले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते विविध शाळांमधील पाच विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात पुस्तकाची प्रत भेट देण्यात आली. कार्यक्रमाला शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व निमंत्रित उपस्थित होते. नॅशनल बुक ट्रस्ट तर्फे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.