18.12.2024: राज्यपालांच्या हस्ते गणवेश व वस्त्र उत्पादक मेळावा २०२४ चे उद्घाटन
18.12.2024: महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज बंगळूर येथे ८ व्या 'गणवेश व वस्त्र उत्पादक मेळावा २०२४' चे उद्घाटन केले. यावेळी राज्यपालांनी विविध प्रदर्शनांना भेट दिली. प्रदर्शनात १२० हून अधिक ब्रँडने सहभाग घेतला असून राज्यपालांनी सर्व संस्थाचे कौतुक केले व त्यांना व्यवसायाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला आमदार सुभाष देशमुख, सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश शहा, असोसिएशनचे फेअर चेअरमन सुनील मेंगजी, असोसिएशनचे उपाध्यक्ष सतीश पवार यांचेसह निमंत्रित उपस्थित होते.
18.12.2024: Maharashtra Governor C. P. Radhakrishnan inaugurated the 8th 'Uniforms and Garments Manufacturer Fair, 2024' at Bengaluru in Karnataka. The Governor visited various exhibitions. More than 120 brands participated in the exhibition. The Governor appreciated all the organizations and wished them success in business. MLA Subhash Deshmukh, President of Solapur Garment Manufacturers Association Nilesh Shah, Fair Chairman of the Association Sunil Mengji, Vice President of the Association Satish Pawar were present on the occasion.