18.12.2021: राज्यपालांच्या हस्ते करोना काळात विविध क्षेत्रात नवोन्मेष करणाऱ्या उद्यमींचा सत्कार
18.12.2021: करोना काळात विविध क्षेत्रांमध्ये नवोन्मेषन करून देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासात योगदान देणाऱ्या नवोन्मेषी उद्योजकांचा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे ‘इम्पॅक्ट क्रिएटर्स अवार्ड’ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन ‘बिलेनियम डिवाज’ या महिला उद्योजिकांच्या संस्थेने केले होते. कार्यक्रमाला भारत सरकारचे मुख्य नवोन्मेषन अधिकारी डॉ अभय जेरे, बिलेनियम डिवाज संस्थेच्या अध्यक्षा श्वेता शालिनी, संचालक भावेश कोठारी, सहसंचालिका मीनल कोठारी व दीपिका सिंह उपस्थित होते.
18.12.2021: Governor Bhagat Singh Koshyari presented the Impact Creators Awards to 35 young innovators and entrepreneurs at a function held at Raj Bhavan Mumbai. The Impact Creators Awards instituted by ‘Billennium Divas’ were presented to innovators in various areas during the COVID-19 pandemic period.