18.06.2025: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यपालांसोबत विविध विषयांवर चर्चा
18.06.2025: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. या बैठकीत विद्यापीठांमधील शिक्षक व शिक्षकेतर पदांवरील भरती, विद्यापीठांमधील वैधानिक पदांची भरती, विभागाचे पहिल्या १०० दिवसांमधील उपलब्धी, शिकाऊ उमेदवारी संलग्न पदवी अभ्यासक्रम, कौशल्य विद्यापीठाशी सहकार्य, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, विद्यापीठांमधील प्रशासन सुधार, सर्व पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी आंतरवासिता, आदी विषयांवर चर्चा झाली. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी वेणुगोपाल रेड्डी, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, उच्च शिक्षण संचालक डॉ शैलेंद्र देवळाणकर, तंत्र शिक्षण संचालक डॉ विनोद मोहितकर, राज्यपालांचे उपसचिव एस राममूर्ती आदी उपस्थित होते.
18.06.2025: Minister for Higher and Technical Education Chandrakant Patil met the Governor of Maharashtra and Chancellor of State Universities C. P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai and held discussions on various matters pertaining to higher education. The meeting discussed topics such as recruitment to the teaching and non-teaching positions in universities, recruitment to statutory posts, achievements of the department during the first 100 days of the government, apprenticeship-embedded degree programmes, collaboration with the Skill University, implementation of the National Education Policy, administrative reforms in universities, and hostel facilities for students of all degree programmes. Additional Chief Secretary (H & TE) B. Venugopal Reddy; Secretary to the Governor Dr. Prashant Narnaware, Director of Higher Education Dr. Shailendra Deolankar; Director of Technical Education Dr. Vinod Mohitkar and Deputy Secretary to the Governor S. Ramamoorthy were among those present.