18.04.2022 : पां वा काणे यांच्या ५० व्या स्मृतीदिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते टपाल तिकिटाचे अनावरण
18.04.2022 : थोर कायदेपंडित व धर्मशास्त्राचे अभ्यासक भारतरत्न महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे यांच्या ५० व्या स्मृतीदिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे एका विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. शियाटिक सोसायटी तसेच टपाल विभागातर्फे आयोजित या कार्यक्रमाला एशियाटिक सोसायटीच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष एकनाथ क्षीरसागर, सोसायटीच्या अध्यक्षा विस्पी बालापोरिया, सोसायटीचे विश्वस्त डॉ भालचंद्र मुणगेकर, मुख्य पोस्ट मास्तर जनरल वीणा श्रीनिवास, मुंबई विभागाच्या पोस्ट मास्टर स्वाती पांडे, मानद सचिव मंगला सरदेशपांडे तसेच काणे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.