18.03.2023 : टाटा स्मृती रुग्णालयातील ५० कर्करोग ग्रस्त मुलांनी घेतली राज्यपालांची भेट
18.03.2023 : टाटा स्मृती रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या ५० कर्करोग ग्रस्त मुलांनी आज आपल्या पालकांसह राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली. यावेळी राज्यपाल बैस यांनी मुलांशी संवाद साधला तसेच त्यांना भेटवस्तूंचे वाटप केले. राज्यपालांनी कर्करुग्ण मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांना यावेळी ५ लाख रुपयांची देणगी जाहीर केली. यावेळी मुलांनी राजभवनाला भेट दिली. लहान मुलांच्या राजभवन भेटीचे आयोजन टाटा मेमोरियल सेंटर - इम्पॅक्ट फाउंडेशन व क्रिश फाउंडेशन या संस्थांनी केले होते. यावेळी इम्पॅक्ट फाउंडेशनच्या मुख्य अधिकारी शालिनी जटिया, क्रिश फाउंडेशनचे संस्थापक नवीन शेट्टी, वंदना शेट्टी, लहान मुलांचे कर्करोग तज्ज्ञ डॉ वेंकट राम मोहन व लहर बच्छावत आदी उपस्थित होते.