18.01.2025 : राज्यपालांच्या हस्ते प्रख्यात गीतकार गुलजार यांना ‘चेंज मेकर’ पुरस्कार प्रदान
18.01.2025 : साहित्य आणि चित्रपट क्षेत्रातील आजीवन योगदानासाठी प्रख्यात गीतकार गुलजार यांना महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते 'चेंज मेकर' पुरस्कार प्रदान केला. भामला फाउंडेशन आणि राविन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित कार्यक्रमात गुलजार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम भारतीय प्रजासत्ताकाच्या ७५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला. राज्यपालांच्या हस्ते यावेळी 'कॉटन मॅन ऑफ इंडिया' सुरेश कोटक, प्रख्यात वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर, उद्योगपती नादिर गोदरेज, एनएसईचे सीईओ आशिष कुमार चौहान, अभिनेते विवेक ओबेरॉय, अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ, साजिद नाडियाडवाला, लक्ष्यराज सिंग मेवाड, मास्टर शेफ विकास खन्ना यांनाही गौरविण्यात आले. कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, महाराष्ट्राचे मंत्री आशिष शेलार आणि पंकजा मुंडे, माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, राविन ग्रुपचे अध्यक्ष विजय कारिया, भामला फाउंडेशनचे संस्थापक आसिफ भामला उपस्थित होते.