17.04.2026: राज्यपालांच्या उपस्थितीत लोकभवन येथे राजस्थान आणि ओडिशा राज्यांचा राज्य स्थापना दिवस साजरा
Zoom 17.04.2026: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत लोकभवन येथे राजस्थान आणि ओडिशा राज्यांचा राज्य स्थापना दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम मुंबई महानगर पालिकेच्या संगीत कला अकादमीच्या सहकार्याने सादर करण्यात आला.
यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या राजस्थान व ओडिशा राज्यांच्या लोकगीत व नृत्याला राज्यपालांनी भरभरुन शाबासकी दिली. भारत सरकारच्या 'एक भारत श्रेष्ठ भारत' उपक्रमाचा भाग म्हणून राजस्थान आणि ओडिशा राज्य स्थापना दिवस लोकभवन येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरोडकर, समितीचे सदस्य, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शिक्षण) डॉ अविनाश ढाकणे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे व पालिकेच्या उपायुक्त (शिक्षण) डॉ प्राची जांभेकर उपस्थित होते.
17.04.2026: The State Foundation Days of Rajasthan and Odisha were jointly celebrated through cultural presentation in presence of Maharashtra Governor Jishnu Dev Varma at Lok Bhavan Mumbai. The cultural programme was presented by Lok Bhavan in collaboration with the Sangeet Kala Academy of Brihanmumbai Municipal Corporation. Chairperson of the BMC Education Committee Rajeshree Shirodkar, committee members, Additional Municipal Commissioner (Education) Dr. Avinash Dhakne, Secretary to the Governor Dr. Prashant Narnaware, Comptroller of the Governor’s Household Dr. Nishikant Deshpande, and Deputy Municipal Commissioner (Education) Dr. Prachi Jambhekar were present.