17.03.2026: नॅशनल डिफेन्स कॉलेज येथे प्रशिक्षण घेत असलेल्या भारत व मित्र देशातील वरिष्ठ सैन्य दल व नागरी सेवा अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट
Zoom 17.03.2026: महाराष्ट्राच्या अभ्यास दौऱ्यावर आलेल्या नॅशनल डिफेन्स कॉलेज येथे प्रशिक्षण घेत असलेल्या भारत व मित्र देशातील वरिष्ठ सैन्य दल व नागरी सेवा अधिकाऱ्यांच्या एका १७ सदस्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन येथे भेट घेतली. शिष्टमंडळामध्ये भारतीय नौदल, वायुदल व स्थलसेनेतील अधिकारी तसेच राजस्व सेवेतील अधिकारी उपस्थित होते. त्याशिवाय रशिया, ओमान, इंडोनेशिया, नायजेरिया, नेपाळ व टांझानिया या मित्र देशांचे वरिष्ठ सैन्य अधिकारी देखिल उपस्थित होते. नॅशनल डिफेन्स कॉलेज येथील वरिष्ठ सल्लागार मेजर जनरल हरकिरत सिंह (सेवा निवृत्त) हे शिष्टमंडळाचे नेतृत्व करीत आहेत.
17.03.2026: A 17-member delegation of senior military and civil service officers from India and friendly countries, currently undergoing training at the National Defence College, called on Governor Jishnu Dev Varma at Lok Bhavan during their study tour of Maharashtra. The delegation included officers from the Indian Navy, Air Force, and Army, as well as officials from the Revenue Service. In addition, senior military officers from friendly countries such as Russia, Oman, Indonesia, Nigeria, Nepal, and Tanzania were also part of the delegation. The delegation was led by Major General Harkirat Singh (retd), Senior Faculty at the National Defence College.