17.01.2024: राज्यपालांची पुणे महानगरपालिकेच्या औंध येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्राथमिक विद्यालयाला भेट
17.01.2024: राज्यपाल रमेश बैस यांनी पुणे महानगरपालिकेच्या औंध येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्राथमिक विद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांचे आणि संवाद कौशल्याचे त्यांनी कौतुक केले. राज्यपालांनी शाळेतील विविध वर्गांना भेट देऊन विद्यार्थ्यांच्या उपक्रमांची माहिती घेतली. यावेळी राज्यपाल महोदयांना शाळेतील बहुकौशल्य अभ्यासक्रम, करिअर मार्गदर्शन, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृती, स्वच्छता उपक्रम, आर्थिक साक्षरता आदी उपक्रमांची माहिती देण्यात आली. यावेळी महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे, तहसीलदार राधिका बारटक्के, शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे, मुख्याध्यापिका कीर्ती सावरमठ, गोमती स्वामिनाथन, सुलभा मेमाणे आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लाठी काठी प्रात्यक्षिक, कराटे आणि छत्तीसगढच्या पारंपरिक नृत्याचे राज्यपालांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या टिकाऊ वस्तूंच्या दालनाला देखील त्यांनी भेट दिली.
17.01.2024: Governor Ramesh Bais visited Punyashlok Ahilyabai Holkar Primary School in Aundh run by the Pune Municipal Corporation and interacted with the students. The Governor visited various classrooms and enquired about the activities of the School. The Governor was briefed about the multi-skill curriculum, career guidance and art work, cleanliness activities, and financial literacy taught at the School. Municipal Commissioner Vikram Kumar, Commissioner School Education Suraj Mandhare, Additional Commissioner Ravindra Binwade, Sub Divisional Officer Sneha Kiswe, Tehsildar Radhika Bartakke, Education Officer Sunanda Wakhare, Principal Kirti Savaramath, Gomti Swaminathan, Sulabha Memane were present on this occasion. The Governor admired the traditional martial art demonstration and the dance of Chhattisgarh presented by the students. He also visited the workshop of sustainable products created by students from waste materials.