15.12.2020 : दृष्टिहीन जनांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे राज्यपालांचे आश्वासन
१५.१२.२०२० : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतील लोकभवन येथे ध्वज निधीला देणगी देऊन अखिल भारतीय अंधांसाठी ध्वज दिनाचे उद्घाटन केले. राज्यपालांच्या हस्ते दिव्यांग उद्योजक भावेश भाटिया यांच्या 'रुक जाना नही' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी एनएबी महाराष्ट्रचे पदाधिकारी उपस्थित होते.
15.12.2020 : नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब ) संस्थेतर्फे दृष्टिहीन लोकांच्या कल्याणसाठी राज्यात चालविण्यात येणाऱ्या अंध मुलींची निवासी शाळा, नेत्रचिकित्सा रुग्णालय तसेच इतर प्रकल्पांसाठी आपण सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी संस्थेचे सहसचिव व दिव्यांग उद्योजक भावेश भाटीया यांच्या ‘रुक जाना नहीं’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.