15.11.2023 : महाराष्ट्र राजभवन येथे प्रथमच झारखंड राज्य स्थापना दिवस साजरा
15.11.2023 : राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राजभवन येथे प्रथमच 'झारखंड राज्य स्थापना दिवस' साजरा करण्यात आला. 'एक भारत श्रेष्ठ भारत' उपक्रमांतर्गत झारखंड राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी झारखंड सरकारचे सांस्कृतिक संचालनालय, जय फाउंडेशन व रुद्र प्रतिष्ठान या संस्थांच्या माध्यमातून झारखंडच्या लोक संस्कृतीचे दर्शन घडविणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी माजी खासदार संजीव नाईक, रुद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय सिंह, अल्केम ग्रुपच्या सीमा सिंह, झारखंड येथील कलाकार सृष्टीधर महतो व लखन गुरिया प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी छट पूजा, छउ नृत्य, कावड यात्रा, पैका नृत्य, फगुआ नृत्य, करम नृत्य, माघे नृत्य आदी कार्यक्रम सादर करण्यात आले. राज्यपाल बैस यांच्या हस्ते तिन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा तसेच कलाकारांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात झारखंडचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचा झारखंड स्थापना दिनानिमित्त संदेश दाखविण्यात आला.