15.11.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सावाचे आयोजन संपन्न
15.11.2022 : भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त नाशिक येथे जनजातीय गौरव दिवस व राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सावाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, पालकमंत्री दादाजी भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आदी उपस्थित होते. यावेळी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या ‘ग्रामसारथी’ या कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन तसेच ‘आदि स्वयंम’ या ऑनलाइन पोर्टलचे आनावरण करण्यात आले. तसेच विविध कला, क्रिडा क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या युवकांचा सन्मान करण्यात आला.