15.11.2021 : राज्यपालांच्या हस्ते मासिक हिंदी विवेकच्या उत्तराखंड विशेषांकाचे प्रकाशन संपन्न
१५.११.२०२१: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लोकभवन, मुंबई येथे विवेक या हिंदी मासिकाच्या उत्तराखंड विशेषांकाचे प्रकाशन केले. ‘उत्तराखंड : देव भूमी से विकास भूमी’ या अंकात उत्तराखंडचा इतिहास आणि संस्कृती, राजकारण, विकास, पर्यटन, कला आणि साहित्य यावर लेख आहेत. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार रमेश पतंगे, उद्योगपती पद्मभूषण रज्जू श्रॉफ, हिंदी ‘विवेक’चे व्यवस्थापकीय संचालक अमोल पेडणेकर आणि कार्यकारी संपादक पल्लवी अन्वेकर उपस्थित होते.