15.10.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत १५ व्या दिवाळी स्नेह संमेलनाचे उदघाटन संपन्न
15.10.2022 : हेतू चॅरिटेबल ट्रस्ट, सक्षम तसेच महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने मालाड मुंबई येथे दिव्यांग व्यक्तींसाठी आयोजित १५ व्या दिवाळी स्नेह संमेलनाचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. दिव्यांग विद्यार्थ्यांना राज्यपालांच्या हस्ते मिठाई व नोटबुक्सचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेच्या आश्रयदात्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या.(नि.) कमलकिशोर तातेड, आयोगाचे सदस्य एम.ए.सईद, हेतू चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रिखबचंद जैन, जिओ संस्थेचे अध्यक्ष घेवरचंद बोहरा, धर्मेश मांडलिया आदी उपस्थित होते. यावेळी दिव्यांग व्यक्तींच्या 'हेतू संगीत समूहा'तर्फे गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.