15.08.2025 : ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यपालांचे राजभवन पुणे येथे चहापान
15.08.2025 : देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गणेशखिंड पुणे येथील राजभवन येथे पारंपरिक चहापान व स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. चहापानाला राज्यपालांच्या पत्नी सुमती राधाकृष्णन, खासदार मेधा कुलकर्णी, माजी मंत्री दिलीप कांबळे, अभिनेते प्रशांत दामले, कविता लाड मेढेकर, अद्वैत दादरकर, दीपक शिर्के, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुरेश गोसावी, प्रकुलगुरु पराग काळकर, CoEP तंत्रशास्त्र विद्यापिठाचे कुलगुरु डॉ सुनील भिरूड, माजी कुलगुरु प्रा नितीन करमळकर, पद्मश्री मुरलीधर पेटकर, पुरस्कार विजेते क्रीडापटू, सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ प्रशासकीय व पोलीस अधिकारी, यांसह विविध क्षेत्रातील निमंत्रित उपस्थित होते. राष्ट्रगीत व राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर राज्यपाल व त्यांच्या पत्नी सुमती यांनी निमंत्रितांच्या भेटी घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.