15.08.2022 : राज्यपालांनी दिली सशस्त्र सैन्य दलाच्या दक्षिण कमांडच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट
15.08.2022 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घोरपडी, पुणे येथील सशस्त्र सैन्य दलाच्या दक्षिण कमांडच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट दिली. देशरक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना राज्यपालांनी यावेळी अभिवादन केले. यावेळी सशस्त्र सैन्य दलाच्या दक्षिण कमांडचे लष्करी अधिकारी व जवान उपस्थित होते. हे राष्ट्रीय युद्ध स्मारक पुणे येथील नागरिकांच्या योगदानातून उभारले आहे.