15.05.2023 : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीच्या तयारीचा राज्यपालांकडून आढावा
15.05.2023 : राज्यपाल आणि राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली आज पारंपरिक, कृषि, आरोग्य विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक राजभवन येथे संपन्न झाली. बैठकीमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी बाबत विद्यापीठांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला तसेच विद्यापीठांशी निगडित सामायिक विषयांवर चर्चा झाली. बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर उपस्थित होते. यावेळी मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी महिला विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरु तसेच प्रभारी कुलगुरु उपस्थित होते.