14.11.2022 :राज्यपालांच्या उपस्थितीत उत्तराखंड व महाराष्ट्र राज्यातील व्यापार सामंजस्य करारावर सह्या
१४.११.२०२२ : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चर (MACCIA) आणि SIDCUL मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन उत्तराखंड यांच्यात लोकभवन मुंबई येथे सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि उत्तराखंडचे उद्योगमंत्री चंदन राम दास यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार करण्यात आला. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी आणि SIDCUL मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. हरिंद्र कुमार गर्ग यांनी सामंजस्य कराराची देवाणघेवाण केली. दोन्ही व्यावसायिक संघटनांचे सदस्य उपस्थित होते.
14.11.2022 : उत्तराखंड व महाराष्ट्र राज्यातील व्यापार व उद्योग संघटनांमध्ये सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर तसेच उत्तराखंड येथील सिडकुल मॅनुफॅक्चरर्स असोसिएशन यांच्यामध्ये सामंजस्य करार संपन्न झाला.