14.05.2021 : मेधा किरीट यांच्या ‘सखी सूत्र’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन संपन्न
१४.०५.२०२१ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते डॉ. मेधा किरीट सोमय्या लिखित 'सखीसूत्र' या पुस्तकाच्या हिंदी, मराठी आणि इंग्रजी आवृत्तीचे लोकभवन, मुंबई येथे प्रकाशन झाले. देशातील प्रसिद्ध नेत्यांच्या पत्नींच्या यशात त्यांचे योगदान अधोरेखित करणारे हे पुस्तक आहे.
14.05.2021 : देशाच्या राजकीय पटलावरील अनेक नेत्यांच्या सहचारिणींचे स्वतंत्र कार्यकर्तृत्व तसेच योगदान उलगडून दाखविणाऱ्या ‘सखी सूत्र’ या मेधा किरीट सोमैया यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या हिंदी, मराठी व इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पार पडले.