14.04.2024 : राज्यपालांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय अग्निशमन सेवा सप्ताहाचा राजभवन येथे शुभारंभ
14.04.2024 : राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राजभवन मुंबई येथे राज्यस्तरीय अग्निशमन सेवा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. यंदा अग्निशमन सेवेकरिता राष्ट्रपती पदक जाहीर झालेल्या महाराष्ट्र अग्निशमन सेवेतील ४ अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवा कर्मचारी कल्याण निधी संकलन मोहिमेचा यावेळी शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालक संतोष वारिक, मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर, महाराष्ट्र अग्निशमन सेवेतील वरिष्ठ अधिकारी तसेच राज्यातील विविध शहरे व संस्थानांचे मुख्य अग्निशमन अधिकारी यावेळी उपस्थित होते. सन १९४४ साली मुंबई डॉकयार्ड येथे जहाजाच्या स्फोटात प्राण गमावलेल्या अग्निशमन अधिकारी व जवानांच्या स्मरणार्थ १४ एप्रिल रोजी राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस पाळला जातो.
14.04.2024 : Maharashtra Governor Ramesh Bais inaugurated the State level Fire Service Week on the occasion of National Fire Service Day at Raj Bhavan Mumbai. The Governor presented the President's Fire Service Medals to four officers and firefighters who have been declared the medals. The Governor also inaugurated the Fund Collection drive for the Maharashtra Fire Service Welfare Fund. Director of Maharashtra Fire Services Santosh Warick. Chief Fire Officer of Mumbai Fire Brigade Ravindra Ambulgekar, senior fire officers of State Fire Services, Heads of various Fire Service establishments in Mumbai and various other cities. The National Fire Service Day is observed on April 14 to commemorate all the brave firefighters who lost their lives during a ship explosion at the Mumbai dockyard in 1944.