14.04.2022 : महावीर जयंतीनिमित्त राजभवन येथे ‘महावीरोत्सव’ संपन्न
14.04.2022 : महावीर जयंतीनिमित्त राजभवन येथे 'महावीरोत्सव' संपन्न
14.04.2022 : भगवान महावीरांच्या २६२१ व्या जयंतीनिमित्त (जन्म कल्याणक) राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत महावीरोत्सवाचे आयोजन करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी समाज कार्यासाठी शैलेंद्र घिया, जमनालाल हपावत, प्रमोद भारेल, घेवरचंद बोहरा, एम. आय. जैन व राकेश जैन नाहर यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.