14.02.2024: राज्यपालांनी दुरस्थ उपस्थितीत अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ संपन्न
14.02.2024: राज्यपाल रमेश बैस यांच्या दुरस्थ उपस्थितीत अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचा ३८ वा दीक्षांत समारंभ संपन्न संपन्न झाला. राज्याचे कृषिमंत्री व विद्यापीठाचे प्रकुलपती धनंजय मुंडे, पंकृवि विद्यापीठ परिसरात झालेल्या दीक्षांत समारोहाला गुजरात येथील नवसारी कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ झेड पी पटेल, पंकृविचे कुलगुरु डॉ. शरद गडाख, राज्यातील कृषि व माफसू विद्यापीठांचे कुलगुरु, विद्यापीठाचे माजी कुलगुरु, विविध विभागांचे अधिष्ठाता, प्राध्यापक तसेच स्नातक उपस्थित होते. यावेळी ४०४० स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या तर ७९ स्नातकांना सुवर्ण व रौप्य पदके तसेच रोख पारितोषिके देण्यात आली.
14.02.2024: Governor and Chancellor of universities Ramesh Bais presided over the 38th Annual Convocation of the Dr Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth (PDKV) Akola through online mode. Gold and Silver medals and Cash prizes were given to 79 graduating students. Minister of Agriculture and Pro Chancellor of the University Dhananjay Munde addressed the Convocation through online mode. The programme held at PDKV Akola campus was attended in person by Dr Z P Patel, Vice Chancellor of Navsari Agricultural University, Dr Sharad Gadakh, Vice Chancellor of PDKV, former vice chancellors and vice chancellors of agricultural universities and MAFSU.