13.10.2022 : राज्यपालांच्या हस्ते ११४ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान
13.10.2022 : राज्यातील ११४ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचा-यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पोलीस शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजभवन मुंबई येथे झालेल्या पोलीस अलंकरण सोहळ्यामध्ये २०२० च्या स्वातंत्र्य दिनी तसेच २०२१ च्या प्रजासत्ताक दिनी जाहीर झालेली पोलीस पदके देण्यात आली. यावेळी पोलीस महासंचालक रजनीश सेठ, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) आनंद लिमये, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर तसेच पोलीस अधिकारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व गौरविण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.