13.06.2024: राज्यपालांच्या दुरस्थ उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ संपन्न
13.06.2024: राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या दृकश्राव्य माध्यमातील उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६४ वा वार्षिक दीक्षांत समारंभ आज विद्यापीठाच्या सभागृहामध्ये संपन्न झाला. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. आशिष लेले यांचे दीक्षांत भाषण केले. या दीक्षांत समारोहात एकूण ६४,२२२ स्नातकांना पदव्या, तर ३३४ स्नातकांना पीएच.डी. पदव्या प्रदान करण्यात आल्या. विद्यापीठ परिसरातून दीक्षांत समारोहाला कुलगुरु डॉ. विजय फुलारी, प्रकुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, विविध विभागांचे अधिष्ठाता, प्राध्यापक व स्नातक उपस्थित होते.
13.06.2024: Governor of Maharashtra and Chancellor of State universities Ramesh Bais presided over the 64th Annual Convocation of the Dr Babasaheb Ambedkar Marathwada University, Chhatrapati Sambhajinagar through online mode. Director of CSIR- National Chemical Laboratory Dr. Ashish Lele delivered the Convocation address. Degrees were awarded to 64,222 graduating students while Ph D was awarded to 334 candidates. Vice Chancellor of the University Dr Vijay Fulari, Pro VC Dr Walmik Sarwade, Director of Board of Examination and Evaluation, Dr Bharti Gawali, Registrar Dr Prashant Amrutkar and Deans, faculty, students and invitees were present.