13.06.2022 : राज्यपालांकडून एव्हरेस्टवीर सविता कंसवालचे अभिनंदन
13.06.2022 : मूळच्या उत्तरकाशी जिल्यातील लोंथरु गावच्या गिर्यारोहक सविता कंसवाल यांनी जगातील सर्वात मोठे शिखर माउंट एव्हरेस्ट तसेच पाचवे मोठे शिखर माउंट मकालू यशस्वी सर केल्याबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व त्यांना कौतुकाची थाप दिली. पंचेवीस वर्षांच्या सविता कंसवाल यांनी दिनांक १२ मे रोजी एव्हरेस्ट तर २८ मे रोजी मकालू शिखर सर केले. अश्या प्रकारे अवघ्या सोळा दिवसांच्या फरकाने दोन मोठी गिरीशिखरे सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला असल्याचे त्यांनी सांगितले.