13.05.2022: दापोली येथील कृषी विद्यापीठाच्या ‘सुवर्ण पालवी’ या कृषि महोत्सवाचे उदघाटन
13.05.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित 'सुवर्ण पालवी' या पाच दिवसांच्या कृषि महोत्सवाचे उदघाटन संपन्न झाले. राज्यपालांनी प्रदर्शनाची पाहणी करुन शेतकरी व उपस्थितांशी संवाद साधला. कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, कृषीमंत्री दादाजी भुसे तसेच भटके आणि विमुक्त व अर्ध भटक्या जाती-जमाती कल्याण आणि विकास मंडळाचे अध्यक्ष दादा इदाते, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत आदी उपस्थित होते.
13.05.2022: Governor Bhagat Singh Koshyari inaugurated 'Suvarna Palvi' an agricultural exhibition organised by Dr Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth on the occasion of its Golden Jubilee. The Governor visited the exhibition and interacted with the farmers and students present. Minister of Higher and Technical Education Uday Samant, Minister of Agriculture Dadaji Bhuse, Dada Idate, Chairman, DeNotified Nomadic Tribal Development Board, Vice Chancellor Dr Sanjay Sawant and others were present.