13.04.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत नागपुर विद्यापीठाचा ११० वा दीक्षांत समारंभ संपन्न
13.04.2023 : राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज नागपुर विद्यापीठाचा ११० वा दीक्षांत समारंभ नागपुर येथे संपन्न झाला. विद्यापीठ यंदा आपल्या स्थापनेचे शताब्दी वर्ष साजरे करीत आहे. राज्यपालांच्या हस्ते डॉ शुभांगी रामचंद्र परांजपे यांना डॉक्टर ऑफ लेटर्स (डि.लिट.) ही पदवी प्रदान करण्यात आली तसेच विविध विद्याशाखांमधील स्नातकांना आचार्य (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी राज्यपालांनी स्नातकांना उद्देशून उपदेश केला तसेच दीक्षांत भाषण केले. दीक्षांत समारोहाला अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ टी जी सीताराम, कुलगुरु डॉ सुभाष चौधरी, प्रकुलगुरु डॉ संजय दुधे, कुलसचिव डॉ राजू हिवसे, संचालक परिक्षा व मूल्यमापन डॉ प्रफुल साबळे, व्यवस्थापन समितीचे सदस्य, विविध विभागाचे अधिष्ठाता, प्राध्यापक तसेच स्नातक विद्यार्थी उपस्थित होते.