13.02.2023 : राज्यपालांच्या हस्ते मोफत तपासणी शिबिरांची माहिती देणाऱ्या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन
13.02.2023 : आंतरराष्ट्रीय अपस्मार दिनाचे औचित्य साधून एपिलेप्सी फाउंडेशन या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत तपासणी शिबिरांची माहिती देणाऱ्या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. प्रकाशन सोहळ्याला खा. प्रफुल्ल पटेल, आ. छगन भुजबळ, एपिलेप्सी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ निर्मल सूर्या, चित्रपट दिग्दर्शक अनिल शर्मा व निमंत्रित उपस्थित होते. अपस्मार आजारावर जनजागृती करण्याच्या हेतूने दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातील दुसऱ्या सोमवारी आंतरराष्ट्रीय अपस्मार दिवस साजरा करण्यात येतो.