12.07.2025 : राज्यपालांच्या उपस्थितीत नॅशनल अकॅडमी ऑफ डिफेन्स प्रॉडक्शन (NADP), नागपूर संस्थेचा पदवीप्रदान समारंभ संपन्न
12.07.2025 : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमी - नॅशनल अकॅडमी ऑफ डिफेन्स प्रॉडक्शन (NADP), नागपूर संस्थेचा पहिला वार्षिक पदवीप्रदान समारंभ संपन्न झाला. यावेळी दोन वर्षांचा व्यवसाय व्यवस्थापन विषयाचा पदव्युत्तर पदविका (२०२३-२०२५) अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या स्नातकांना राज्यपालांच्या हस्ते पदविका प्रदान करण्यात आल्या. यावेळी संस्थेच्या संचालक मंडळाच्या सदस्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुरुवातीला राज्यपालांनी संस्थेच्या परिसराची पाहणी केली. यावेळी म्युनिशन्स इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय हजारी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, NADP चे प्रधान संचालक डॉ. जे. पी. दाश, म्युनिशन्स इंडिया लिमिटेडचे मानव संसाधन संचालक जे. पी. नाईक, अकादमीच्या संचालक मंडळाचे सदस्य, अतिथी प्राध्यापक आणि स्नातक विद्यार्थी उपस्थित होते.