12.06.2025: राज्यपालांनी कोयंबतूर येथील अमृता विश्व विद्यापीठमतर्फे आयोजित ‘सद्गमय’ या सांस्कृतिक शिबिराचे उद्घाटन केले.
12.06.2025: महाराष्ट्राचे राज्यपाल आणि राज्य विद्यापीठांचे कुलपती श्री. सी. पी. राधाकृष्णन यांनी कोयंबतूर येथील अमृता विश्व विद्यापीठमतर्फे आयोजित ‘सद्गमय’ या सांस्कृतिक शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी राज्यपालांनी आजच्या शैक्षणिक संदर्भात भारतीय ज्ञान प्रणालीचे महत्त्व या विषयावर आपले विचार मांडले. या कार्यक्रमाला अमृता विश्व विद्यापीठमचे कुलगुरू डॉ. पी. वेंकट रंगन, माता अमृतानंदमयी मठाचे कोषाध्यक्ष व विश्वस्त स्वामी रामकृष्णानंदपुरी, विद्यार्थी उपप्रमुख डॉ. एस. महादेवन आणि कृषी विज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. सुधीश मनलिल हे उपस्थित होते.
12.06.2025: Maharashtra Governor and Chancellor of state universities C.P. Radhakrishnan inaugurated 'Sadgamaya' - a cultural retreat organised by the Amrita Vishwa Vidyapeetham in Coimbatore. The Governor offered his insights on the relevance of the Indian Knowledge System in today’s academic context. Dr. P. Venkat Rangan, Vice Chancellor of Amrita Vishwa Vidyapeetham, Swami Ramakrishnananda Puri, Treasurer & Trustee of Mata Amritanandamayi Math, Dr. S. Mahadevan, Associate Dean of Students and Dr. Sudheesh Manalil, Dean-Agricultural Sciences, AMRITA were present.