11.10.2024: राज्यपालांची यवतमाळ येथे लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, उद्योजक तसेच कला क्रीडा क्षेत्रातील विविध समूहांशी चर्चा
11.10.2024: राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज यवतमाळ येथील शासकीय विश्रामगृह येथे लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे स्थानिक नेते, शेतकरी, उद्योजक, क्रीडापटू, पत्रकार तसेच समाज सेवकांशी यवतमाळ जिल्ह्याच्या सामाजिक आर्थिक विकासासंदर्भात चर्चा केली. सुरुवातीला जिल्ह्य़ाचे पालक मंत्री डॉ. संजय राठोड, आमदार मदन येरावार, आ.प्रा.डॉ. अशोक उईके, आ.संजीवरेड्डी बोदकूरवार आदींनी राज्यपालांची भेट घेतली. यवतमाळ चेंबर ऑफ कॉमर्स, एमआयडीसी यवतमाळ व उमरी पाठारे येथील वृद्धाश्रम यांचे प्रतिनिधी, प्रगतिशील शेतकरी, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त खेळाडू यांनी राज्यपालांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. सुरुवातील जिल्हा प्रशासनातर्फे राज्यपालांसमोर यवतमाळ जिल्ह्यासंबंधी सादरीकरण करण्यात आले. विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे , जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पोलिस अधिक्षक कुमार चिंता, यांसह विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
11.10.2024: Governor C. P. Radhakrishnan today held a discussion with people's representatives, local leaders of political parties, farmers, entrepreneurs, sportspersons, journalists and social workers regarding the socio-economic development of Yavatmal district at the Government Guest House in Yavatmal. Earlier, the Guardian Minister of the district Dr. Sanjay Rathod, MLA Madan Yerawar, Prof. Dr. Ashok Uike, A. Sanjeevreddy Bodkurwar and others met the Governor. Representatives of Yavatmal Chamber of Commerce, MIDC Yavatmal and Old Age Home at Umri Pathare, progressive farmers and national award winning athletes also had interaction with the Governor. District Collector Dr Pankaj Ashiya made a presentation about Yavatmal district before the Governor. Divisional Commissioner Dr. Nidhi Pandey, Chief Executive Officer of ZP Mandar Patki, SP Kumar Chintha and officials of various departments were present.