11.03.2026: राज्यपालांनी चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले
11.03.2026 : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी दादर येथील चैत्यभूमी येथे जाऊन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले. यावेळी राज्यपालांच्या उपस्थितीत त्रिशरण बुद्ध वंदना करण्यात आली. मुंबईच्या महापौर रितू तावडे, भन्ते राहुल बोधी महाथेरो, डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे यावेळी उपस्थित होते. भारतीय बौद्ध महासभेचे प्रताप कांबळे, भिकाजी कांबळे व प्रतीक कांबळे यांनी राज्यपालांना संविधानाची प्रत भेट दिली.
11.03.2026: Maharashtra Governor Jishnu Dev Varma visited Chaityabhoomi and paid floral tributes at the memorial of the architect of the Constitution Bharat Ratna Dr. B. R. Ambedkar. The Trisharan Buddha Vandana was recited in the presence of the Governor. Mumbai Mayor Ritu Tawde, Bhante Dr Rahul Bodhi Mahathero, General Secretary of the Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Samanvay Samiti Nagasen Kamble were present. Pratap Kamble, Bhikaji Kamble and Pratik Kamble from the Indian Buddhist Mahasabha presented a copy of the Constitution to the Governor.