10.08.2025 : राज्यपालांच्या उपस्थितीत एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा २१ वा पदवीदान समारंभ संपन्न
10.08.2025 : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी चेन्नई येथील एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या २१ व्या पदवीदान समारंभाला संबोधित केले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन आणि भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रवीचंद्रन यांना विज्ञानातील मानद डॉक्टरेट (डी.एस्सी.) पदवी प्रदान करण्यात आली. या वेळी एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे संस्थापक कुलपती डॉ. टी. आर. पारिवेन्धर, प्र- कुलपती (प्रशासन) डॉ. रवी पचमुथ्थू, प्र-कुलपती (शैक्षणिक) डॉ. पी. सत्यनारायणन, तिरुची व रामापूरम कॅम्पसचे अध्यक्ष डॉ. आर. शिवकुमार, कुलगुरु डॉ. सी. मुथमिळचेलवन, कुलसचिव डॉ. एस. पोनुसामी, कार्यकारी मंडळाचे सदस्य, प्राध्यापकवर्ग, पालक आणि पदवीधर विद्यार्थी उपस्थित होते.