10.02.2025 : भारताची तरुण टेनिस खेळाडू माया राजेश्वरनने घेतली राज्यपालांची भेट
10.02.2025 : सध्या WTA क्रमवारीत असलेली सर्वात लहान टेनिस खेळाडू माया राजेश्वरन हिने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. राज्यपालांनी मायाचे अभिनंदन केले आणि तिला भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. कोयंबतूरच्या पोलाची येथील माया लवकरच ज्युनियर ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये खेळणार आहे. भेटीवेळी मायाची आई रेवती या देखील उपस्थित होत्या.