10.02.2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबई येथे आगमन; राज्यपालांनी केले स्वागत
Zoom 10.02.2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज एक दिवसाच्या मुंबई भेटीसाठी आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथुन मुंबई ते सोलापूर व मुंबई ते साईनगर शिर्डी या दोन वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवी झेंडी दाखवून रवाना करणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईतील मरोळ येथील दाऊदी बोहरा समजाची शैक्षणिक संस्था अलजामिया-तुस-सैफिया (सैफी अकादमी) चे देखील उदघाटन होणार आहे.
10.02.2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज एक दिवसाच्या मुंबई भेटीसाठी आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथुन मुंबई ते सोलापूर व मुंबई ते साईनगर शिर्डी या दोन वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवी झेंडी दाखवून रवाना करणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईतील मरोळ येथील दाऊदी बोहरा समजाची शैक्षणिक संस्था अलजामिया-तुस-सैफिया (सैफी अकादमी) चे देखील उदघाटन होणार आहे.