09.10.2024: राज्यपालांची बीड जिल्हयामध्ये लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, उद्योजक तसेच कला क्रीडा क्षेत्रातील विविध समूहांशी चर्चा
09.10.2024:राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आज एक दिवसाच्या भेटीसाठी बीड येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृह येथे आगमनानंतर राज्यपालांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. जिल्हा प्रशासनातर्फे राज्यपालांसमोर एक सविस्तर सादरीकरण करण्यात आले. विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने, पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. साहित्य, कला, नाट्य, संस्कृती, शिक्षण, व्यवसाय, माध्यम व उद्योग यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देखील राज्यपालांची भेट घेतली. लोकप्रतिनिधी तसेच विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी देखील राज्यपालांची भेट घेऊन जिल्ह्याच्या समस्यांविषयी चर्चा केली. आ. संदीप क्षीरसागर, आ. नमिता मुंदडा, माजी आ. सय्यद सलीम सय्यद अली, एड. उषा दराडे राजेंद्र मस्के, उद्योजक मनु दुगड, अशोक शेटे, राजीव संचेती, डॉ. सुधीर निकम, डॉ. संजय पाटील आदींनी राज्यपालांची भेट घेतली.
09.10.2024: Maharashtra Governor C.P. Radhakrishnan arrived in Beed for a one-day visit. On arrival at the Government Guest House, the Governor was given a Guard of Honour by the police. A presentation was made by the district administration before the Governor. Div. Commissioner Dilip Gawde, Collector Avinash Pathak, CEO of Z.P. Aditya Jeevne, SP Avinash Bargal and senior officers were present. Eminent persons from various fields including literature, art, theatre, culture, education, business, media and industry also met the Governor. People's representatives as well as representatives of various political parties also met the Governor and discussed the problems of the district. MLA Sandeep Kshirsagar, MLA Namita Mundada, Ex.MLA Syed Salim Syed Ali, Adv. Usha Darade, Rajendra Maske, Entrepreneur Manu Dugad, Ashok Shete, Rajeev Sancheti, Dr. Sudhir Nikam, Dr. Sanjay Patil and others met the Governor.