09.08.2022 : राज्यपालांच्या हस्ते भारत नाट्य महोत्सवाचे उदघाटन संपन्न
09.08.2022 : राष्ट्रीय नाट्य प्रशिक्षण संस्था (नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा) या संस्थेने पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या सहकार्याने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या पाच दिवसांच्या भारत नाट्य महोत्सवाचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत पार पडले. उदघाटन सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, निर्माते दिग्दर्शक सतीश कौशिक, ज्येष्ठ रंगकर्मी व केंद्रीय चित्रपट प्रमाण मंडळाच्या सदस्या वाणी त्रिपाठी टिक्कू, राष्ट्रीय नाट्य संस्थेचे (एनएसडी) संचालक रमेश चंद्र गौड व पु ल देशपांडे अकादमीचे संचालक संतोष रोकडे प्रामुख्याने होते.